Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलकडून पाच किलो सोने जप्त, पुणे पोलिसांची धडक कारवाई..


Lalit Patil Drugs Case :  ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली आहे. ललितकडून पोलिसांनी आणखी ५ किलो सोनं जप्त केले आहे. यापूर्वी ललितचा साथीदार भूषण याच्या नाशिक येथील घरातून तीन किलो सोने जप्त करण्यात आले होते.

गुरुवारी पुणे पोलिसांची एक टीम ललित पाटीलला घेऊन नाशिकला गेली होती. त्यानंतर त्यांनी हे सोनं जप्त केलं आहे. ललितने अंमली पदार्थांमधून लाखो रुपये कमवले होते. ही सर्व रक्कम त्याने सोन्यात कनवर्ट केली होती. तसेच काही रक्कम त्याच्या दोन मैत्रिणींकडे ठेवण्यासाठी दिली होती. Lalit Patil Drugs Case

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित पाटीलने एका व्यक्तीकडे हे सोने ठेवण्यासाठी दिले होते. याशिवाय अंमली पदार्थ तयार करणाऱ्या ललित पाटील आणि टोळीवर पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील व त्याच्या १२ साथीदारांवर पुणे पोलिसांकडून मोक्कामार्फत कारवाई सुरु आहे. अरविंदकुमार लोहरे आणि ललित हे त्यांच्या टोळीचे प्रमुख होते. लोहरे एमडी बनवणारा महाराष्ट्रातील एक्स्पर्ट होता, या सर्वांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात.

ललितला शिवाजीनगर न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांकडून ललिल, साथीदार शिवाजी शिंदे, राहुल पाठक यांची चौकशी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. गुरुवारी (२ नोव्हेंबर) पुणे पोलिसांचे पथक ललित घेऊन नाशिकला तपासासाठी घेऊन गेले. ललितकडून पोलिसांनी पाच किलो सोने जप्त करण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!