उरुळी कांचन येथे गाडीची काच फोडून २२ तोळे सोने तसेच रोख १ लाख रुपये लंपास ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


उरुळी कांचन, (पुणे) : पुणे सोलापूर महामार्गाच्या शेजारी हॉटेलच्या बाहेर लावलेल्या एका चारचाकी गाडीची काच फोडून तब्बल अंदाजे २२ तोळे सोन्याचे दागिने व १ लाख रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

हि घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गारवा हॉटेलच्या बाहेर शनिवारी (ता. २७) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदरची व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय कर्नाटक या ठिकाणी असलेल्या मंगरूळ या ठिकाणी गेले होते. देवदर्शन करून परत कर्नाटकवरून मुंबई या ठिकाणी निघाले होते.

यावेळी उरुळी कांचन येथील गारवा हॉटेल या ठिकाणी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी थांबले होते. जेवण करून गाडीजवळ आले असता सदर गाडीची पाठीमागील काच हि फुटलेल्या अवस्थेत दिसून आली.

त्यानंतर त्यांनी तात्काळ पाठीमागील गाडीचा दरवाजा उघडून पहिले. गाडीत ठेवलेले २२ तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल आढळून आला नाही. सदर घटनेचा पंचनामा करून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!