लाडकी बहीण योजना अपडेट : लाडकीला ऑगस्ट -सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार? बहिणी प्रतीक्षेतच..


पुणे : राज्यातील आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली.21 ते 65 वयोगटातील कोट्यावधी महिला या योजनेचा लाभ घेत असून दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र आता ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना आला तरी लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याचे ऑगस्टचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. या संदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली असून लाडक्या बहिणींना,,ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून असे 3 हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून लाडक्या वहिनी ऑगस्ट महिन्याच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. आता या लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, हे हप्ते एकत्र देणार की, दोन वेगवेगळ्या तारखांना दिले जाणार याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तसेच या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाहीये. पण हे पैसे मिळणार कधी याकडे राज्यभरातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

दरम्यान अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले होते. तब्बल 2 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले होते. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होत असल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!