Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना नव्या वर्षात मिळणार डिसेंबरचा हप्ता?, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष…

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अशातच आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे’ २१०० रुपये कधी मिळणार, याची राज्यभरातील महिलांना प्रतीक्षा लागली आहे.
तसेच अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मात्र, आता लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार असा प्रश्न पडला आहे. Ladki Bahin Yojana

अधिवेशन संपले, आता डिसेंबर महिना संपत आला, तरी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये जरी अधिवेशनानंतर रक्कम जमा होईल असे सांगितले असले, तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना नव्या वर्षातच हप्ता मिळण्याचा अंदाज आहे.