Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांच्या खात्यात आले लाडकी बहीण योजनेचे पैसे, इतरांच्या खात्यात कधी येणार? जाणून घ्या..
Ladki Bahin Yojana : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे १७ ऑगस्ट २०२४ ला पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यापूर्वी १५ ऑगस्टचे निमित्त साधत राज्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील किती महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली. त्यानुसार राज्यातील ३५ लाख भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. तसेच महिन्याअखेर सव्वा कोटी महिल्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगितले आहे.
पुण्यात सिंहगड रोडवरील पुलाच उद्घाटन अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाले. त्यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातही माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली. त्याचा आनंद आहे. आता १७ तारखेला मोठा कार्यक्रम पुण्यात घेत आहोत. Ladki Bahin Yojana
अनेक टीका झाल्या पण बुधवारी ३५ लाख माय बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले. तसेच आज आणि उद्या ५० लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. १.२५ कोटी महिलांच्या खात्यात महिन्याअखेर आम्ही पैसे देणार आहोत. ‘बोले तैसा चाले त्याची वांदावी पाऊले’, असे आमचे सरकार आहे.