Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता होणार जमा, ‘या’ दिवशी सरकारकडून थेट बँक खात्यात येणार पैसे…


Ladki Bahin Yojana 2024 : राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत महिलांना अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहे.

अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार जिल्ह्यातील साडेअकरा लाख लाडक्या बहिणींच्या भेटीसाठी शुक्रवारी (ता२७) शिर्डीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे महिला सशक्तीकरण मेळावा होणार आहे.

मतसेच यावेळी हसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. Ladki Bahin Yojana 2024

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ५२ हजार ४५६ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिर्डी येथे महिला सशक्तीकरण मेळावा होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आवर्जून उपस्थित राहणार असून अधिकाधिक महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.

या दिवशी होणार तिसरा हप्ता जमा..

या योजनेच्या तिसऱ्या हप्ता २९ सप्टेंबर महिन्याच्या आखरी आठवड्यात शासनातर्फे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे.

त्यासाठी पात्र झालेल्या महिलांनी आपल्या बँक खाते त्वरित आधार कार्डची लिंक करून ठेवावे जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होण्यास कोणती अडचण निर्माण होणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!