Ladki Bahin Yojana 2024 : …तर लाडकी बहीण योजना होणार बंद!! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठं वक्तव्य

Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा सुरु होती. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते बारामतीमध्ये आयोजित सभेत बोलत होते. त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे.
लाडकी बहिणींच्या खात्यात आचारसंहिता लागण्यापूर्वीच ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे जमा झाले आहेत, त्यांना पैसे मिळताच तर तुमच्या का? पोटात दुखते असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. जर विरोधक सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद पाडण्याच्या हालचाली होऊ शकतता, योजनेसाठी पुन्हा आपलं सरकार आले पाहिजे असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार चांगलेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करणं माझी चुक होती. जो काम करतो त्याच्याकडून चुका होतात. मी मोठ्या मनानं माझी चूक कबूल करतो. मात्र आता कोणाचं चुकलं? पहिला फॉर्म मी भरणार होतो. Ladki Bahin Yojana 2024
आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमीली. आम्ही बिकट परिस्थितीमधून वर आलो. आईने आधार दिला. आईने सांगितलं माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी समजून सांगायला पाहिजे होतं. मात्र फॉर्म भरायला कोणी सांगितला तर साहेबांनी मग साहेबांनी आमचं घर फोडलं का? असा सवाल करताच अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.