Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची संवेदनशील माहिती सोशल मीडियात व्हायरल, नेमकं प्रकरण काय?


Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.

तसेच अनेक महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. या योजनेच्या लाभासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केला आहे. या साठी त्यांनी बँकेत मोबाईल क्रमांक, पत्ता, बँक खाती आदी खासगी माहिती बँकेत दिली आहे. मात्र, पालघरमध्ये तब्बल ११ हजार १७२ महिलांची ही संवेनशील सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

भविष्यात या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. यामुळे महिलांमध्ये रोषाचे वातावरण आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या माहितीत मोबाइल आणि आधार क्रमांक नसल्याचा दावा करण्यात आला असला तर उर्वरित राज्यात देखील हा प्रकार घडला असल्याची शक्यता असल्याने सायबर गुन्हेगार याचा फायदा घेण्याची शक्यता आहे.

योजनेच्या सुरवातीला लाभार्थी महिलांच्या खात्यात २ महिन्यांचे ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहे. या योजनेसाठी जुलै महिन्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या साठी महिलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेची माहिती यासह इतर खासगी माहिती देखील भरून घेण्यात आली. मात्र, पालघरमध्ये अनेक महिलांची ही खासगी माहिती सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana 2024

तब्बल ११ हजार १७२ महिलांची माहिती ही व्हायरल झाली आहे. ही माहिती कशी लिक झाली. तसेच या साठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे. व्हायरल झालेल्या यादीमध्ये आधार व बँक खातेक्रमांक नसल्याकहा दावा करण्यात आला असला तरी या माहितीच्या आधारे सायबर चोरटे मोठा फ्रॉड करण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!