Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते १७ ऑगस्टला जमा होणार, ३ हजार रुपये येणार, महत्वाची माहिती आली समोर


Ladki Bahin Yojana 2024 : गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची सातत्याने चर्चा सुरु आहे. या योजनेद्वारे २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. गेल्या १ जुलै २०२४ पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

त्यातच, आता, लाडक्या बहि‍णींसाठी आणखी एक गुडन्यूज आली आहे. त्यानुसार, १७ ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हफ्ता ३००० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे, रक्षाबंधनापूर्वीच बहि‍णींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे १७ ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील.

दरम्यान, १७ ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!