Ladki Bahin Yojana 2024 : लाडक्या बहिणींची होणार दिवाळी गोड! आता योजनेचे दोन हप्ते आताच जमा होणार, जाणून घ्या..


Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अशातच आता लाडक्या बहणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते मिळणार आहे. या योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत २.५२ कोटी महिलांनी अर्ज केले आहेत, त्यातील दोन कोटी ४१ लाख ३५ हजार महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

तसेच विधानसभा आचारसंहितेची शक्यता असल्याने सध्या जुलै-ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या पात्र अंदाजे दीड कोटी महिलांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर, नोव्हेंबरचे अ डव्हान्स हप्ते (प्रत्येकी तीन हजार) दिले जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार असल्याचे अपेक्षित असून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर योजनेतील लाभार्थीना त्या काळात पैसे द्यायला अडथळा येवू शकतो.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचेही दोन हप्ते आताच दिले जात आहेत. योजना सुरु झाल्यापासून जुलै ते नोव्हेंबर या काळातील साडेसात हजार रुपये मिळाल्याने महिलांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना योजना सुरू झाल्यापासून टप्प्याटप्याने निधी वितरित केला जात आहे. काही दिवसांत सर्वच पात्र लाभार्थीना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी निधीची व्यवस्था केली असल्याची माहिती, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!