Ladki Bahin Yojana 2024 : सॉफ्टवेअरची अडचण, या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण..

Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.
अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालये आणि सेतू केंद्रांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत. आता अर्ज भरल्या महिलांना झटका बसणार आहे. मराठी भाषेतून भरलेले अर्ज रद्द होणार आहे. शासनाच्या नव्या नियमाने महिलांची धावपळ उडत आहे. दरम्यान मनसेने काळया फिती लावून या प्रकाराचा निषेध केला आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत. यापूर्वी मराठीमध्ये अर्ज दाखल करण्यात आले. मात्र आता फक्त इंग्रजीमध्ये भरण्यात येणार अर्ज ग्राह्य धरणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
अर्जांची छानणी करण्याचे काम शासनाने ज्या एजन्सीकडे दिले आहे, त्या एजन्सीच्या सॉप्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेची कमांड आहे. मराठी भाषाच त्यांच्याकडे नाही. त्यामुळे या योजनेचे ऑनलाइन अर्ज हे इंग्रजीतूनच भरले स्वीकारण्यात येणार आहे. जे अर्ज मराठी भाषेतून भरण्यात आले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जातील.
दरम्यान, लाडकी बहीण योजना पुन्हा वादात आली आहे. केवळ मराठी भाषेचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असल्याने मनसे आक्रमक झाली आहे. बुलढाण्यात मनसेने काळया फिती लावून निषेध केला आहे. अर्ज हे इंग्रजीतूनच भरले जावे जे अर्ज मराठी भाषेतून भरण्यात आले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जाणार असल्याने महिलांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.