Ladki Bahin Yojana 2024 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट, सरकारने घेतला मोठा निर्णय…

Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती, त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबाजावणी सुरू झाली.
आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हापते जमा झाले आहेत. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हापता अँडव्हास जमा करण्यात आला होता. म्हणजे ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाचवेळी तीन हजार रुपये जमा करण्यात आले. दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana 2024
यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना ३०५० कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणी – १५०० कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी १२५० कोटी, मुंबई मेट्रोसाठी अर्थ सहाय्य म्हणून –१२१२ कोटी, आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी – ५१४ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी – ५१४ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्यानं हे लाडक्या बहिणीसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जातं आहे.