शिरूर येथे पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या मजुरांनीच केली ९४ हजार रुपयांची चोरी, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल..


शिरूर : पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या चार कामगारांनीच पंपावरील रोख रक्कम 94 हजार 520 रुपये चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील निमोणे गावच्या हद्दीत असलेल्या परफेक्ट एच. पी. पेट्रोलपंपावर घडली आहे. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी राजश्री अनिल काळे (वय 43,व्यवसाय: गृहीणी,रा.निमोणे,ता. शिरूर,जि.पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रामेश्वर हरिशचंद्र गर्गोंड (रा.खबरा, थाना देवरी,जि.रामसेन,मध्यप्रदेश), रमन सिताराम ठाकूर (रा.मदनपुर बरेली,जि.नरसिंगपूर,मध्यप्रदेश) , आकाश विक्रम ठाकूर (रा.सहजपूर ऊटकटा,जि.सागर,मध्यप्रदेश), सोनू ठाकूर (पूर्ण नाव माहिती नाही) (रा. हाथीडोल,नमाखेडा थाना देवरी, जि.रामसेन,मध्यप्रदेश) या चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, ही घटना सोमवारी (ता.21) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी पेट्रोलपंपावरील चारही कामगारांनी एकत्रितपणे संमतीने व लबाडीच्या उद्देशाने पंपावर जमा झालेली रक्कम आणि इतर रोख मिळून 94 हजार 520 रुपये चोरून नेल्याचे काळे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!