पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच, व्यापाऱ्यावर केला कोयत्याने हल्ला, खळबळ उडवून देणारं कारण आलं समोर..
पुणे : पुण्यातील वेगवेगळ्या भागात कोयता गॅंग सक्रिय असून सर्रास दहशत माजवण्याचा प्रकार काही थांबायचं नाव घेत नाहीये. . ही गॅंग गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत आहे. त्याचबरोबर लोकांवर वार करायला देखील घाबरत नाही. त्यामुळे या गॅंगने लोकांच्या मनात भीती निर्माण केली.
या गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांकडून केले जाणारे प्रयत्न अपूर्ण ठरत आहेत. आता पुन्हा एकदा कोयता गॅंगने दहशद पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणांनी पिंपरी- चिंचवड शहरातील रुपीनगर परिसरात दुकानदारावर कोयताने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
या भागात कपड्याच्या दुकानात काही तरुण खरेदीसाठी आले. यावेळी चप्पल बाहेर काढा असे दुकानदाराने तरुणांना सांगितले. तरुणांना या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी दुकानदारावर कोयतने हल्ला केला.
दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. कोयता गॅंगच्या या प्रकारामुळे नारीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गॅंगचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील नागरिक पोलिसांकडे करत आहेत.