Koregaon Park : रेडीरेकनरच्या दरात वाढ नाहीच, दरामध्ये कोरेगाव पार्क आघाडीवर, जाणून घ्या…


Koregaon Park : राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनरच्या दरात यावर्षी कोणतीही वाढ केली नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मागील वर्षीचेच दर येत्या वर्षात (२०२४-२५) लागू असणार आहेत. यामध्ये बदल होणार नाही.

असे असले तरी नेहमीप्रमाणे शहरातील कोरेगाव पार्क भागाने सर्वाधिक दर असण्याची परंपरा कायम राखली आहे. याठिकाणी नेहेमी इतरांपेक्षा जास्त दर असतो. शहरातील मेट्रो प्रकल्पामुळे विष्णूशास्त्री चिपळूणकर (विधी महाविद्यालय) रस्त्यालगत असलेल्या कांचन गल्ली, अशोक पथ परिसर हा भाग दुसर्‍या क्रमांकावर आहे.

तिसर्‍या क्रमांकावर प्रभात रस्त्यावरील काशिनाथशास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक १५) आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गावरील पौड रस्ता आणि कर्वे रस्ता या परिसरातील दर हे तेजीत आहेत. यामुळे हा भाग देखील चर्चेत आहे.

कोरेगाव पार्क आणि प्रभात रस्ता या परिसरातील दर नेहमी रेडीरेकनरच्या दरात आघाडीवर असतात. कोरेगाव पार्कमधील रेल्वे ओव्हर ब्रीज ते बंडगार्डन पूल हा भाग दरामध्ये पहिल्या स्थानावर असतो. या भागातील दर प्रतिचौरस फूट दर १६ हजार रुपयांच्या आसपास आहेत. Koregaon Park

वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गात मेट्रो धावू लागल्याने या मार्गालगत असलेल्या प्रभाग रस्ता, विधि महाविद्यालय रस्त्यांबरोबरच कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावरील दर चढे आहेत. विधि महाविद्यालय रस्त्यालगत असलेल्या कांचनगल्ली, अशोक पथ परिसरात दर हे १५ हजार २८८ रुपये प्रतिचौरस फूट आहेत.

तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या प्रभात रस्त्यावरील काशिनाथ शास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक 15) या भागातील दर १४ हजार ३१२ रुपये प्रतिचौरस फूट आहेत. आयकर रस्त्यावरील दर हे १३ हजार ७१८ रुपये प्रतिचौरस फूट आहेत.

मेट्रो सुरू झालेल्या कर्वे रस्त्यावरील रेडीरेकनरचे दर चढे आहेत. या ठिकाणचे दर प्रतिचौरस फूट १३ हजार ८३५ रुपये आहेत. पौड रस्त्यावरील दर ११ हजार ४८५ रुपये आहे. तसेच, कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी ते गरवारे महाविद्यालयापर्यंतचे दर १२ हजार ८३० रुपये आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!