कोल्हापूर हादरलं! एकाच वेळी 6 डान्सर तरुणींनी कापल्या हाताच्या नसा, धक्कादायक माहिती आली समोर…


कोल्हापूर : कोल्हापूर शहरात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. इथं सहा डान्सर तरुणींनी एकाच वेळी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ब्लेडने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या होत्या.

सहा तरुणींनी अशाप्रकारे सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या सहा नृत्यांगणांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणामुळे केला, याचे नेमके कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, या तरुणींना सलग दोन महिने महिला सुधारगृहात राहावे लागल्याने नैराश्य आलं होतं. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

       

दरम्यान, विशेष म्हणजे, या सहा तरुणींना दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी एका कारवाईदरम्यान ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी पोलिसांनी कोल्हापुरातील कात्यायनी परिसरातील एका फार्महाऊसवर धाड टाकली होती.

या फार्महाऊसवर या सहाही तरुणी डान्स पार्टी करताना आढळून आल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन महिला सुधारगृहात पाठवलं होतं. आता या सहाही डान्सर तरुणींनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. एकाच वेळी सहा तरुणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने महिला सुधारगृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!