पंढरपूर आषाढी वारीचे वेळापत्रक जाणून घ्या…

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण देशभरातून भाविक, वारकरी मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होत असतात. यंदा २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून वारकरीपंढरपूर येथे दर्शनासाठी येतात. त्यासाठी संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून १० जून रोजी तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून ११ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
पहिला मुक्काम इनामदार वाडा येथे होणार आहे. ११ जून रोजी आकुर्डी, १२ जून रोजी नानारपेठ, १३ जून रोजी नानारपेठ निवडुंगा विठ्ठल मंदिर, १४ जून रोजी लोणीकाळभोर, १५ जून यवत, १६ जून वरवंड, १७ जून रोजी उंडवडी गवळ्याची, १८ जून बारामती, १९ जून रोजी सणसर, २० जून रोजी आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण होईल व मुक्काम., २१ जून निमगाव केतकी, २२ जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, २३ जून रोजी सराटी.
२४ जून रोजी निरा स्नान व तिसरे गोल रिंगण आणि अकलूज येथे मुक्काम., २५ जून रोजी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण, तर रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. २६ जून रोजी सकाळी धावा रात्री पालखी मुक्का पिराची कुरोली येथे होणार आहे. २७ जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व वाखरी येथे मुक्काम. २८ जून रोजी वाखरीवरुन पालखी पंढरपुरात दाखल होईल. दुपारी उभे रिंगण व त्यानंतर पंढरपुरातील संत तुकाराम महाराज मंदिर येथे पालखी सोहळा होईल.
बुधवार, दि २९ जून रोजी तुकाराम महाराज संस्थान मंदिर येथे पालखी मुक्कामी असेल. २९ जून ते ३ जुलै रोजी दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महारज संस्थानच्या नवीन इमारतीमध्ये असेल. नंतर परतीचा प्रवास सुरु होईल. १३ जुलै रोजी पालखी देहू येथे विसावेल.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे संपूर्ण वेळापत्रक…
११ जून रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान. १२ जून रोजी भवानी पेठ, पुणे. १३ जून रोजी पुणे. १४ जून रोजी सासवड. १५ जून रोजी सासवड. १६ जून रोजी जेजुरी. १७ जून रोजी वाल्हे.१८ जून रोजी लोणंद. १९ जून रोजी लोणंद. २० जून रोजी तरडगाव. २१ जून रोजी फलटण (विमानतळ)
२२ जून रोजी बरड. २३ जून रोजी नातेपुते. २४ जून रोजी माळशिरस. २५ जून रोजी वेळापूर. २६ जून रोजी भंडीशेगाव. २७ जून रोजी वाखरी. २८ जून रोजी पंढरपूर. २९ जून रोजी आषाढी वारी.