धक्कादायक! परप्रांतीय मजुराचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत; दौंड तालुक्यातील राहू येथील घटना..


दौंड : एका परप्रांतीय कामगाराचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक राहू (ता. दौंड) येथील सोनवणे डेअरी फार्म परिसरातून उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (ता. २४) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

भीमकुमार अनिल यादव (वय-३०, मूळ रा. जयपूर, ता. मेहंदीया, जि. आरवल, बिहार) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी राहूचे पोलिस पाटील सुरेश सोनवणे यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, भीमकुमार हा विजय ऊर्फ रामराव शहाजी सोनवणे यांच्या ‘सोनवणे डेअरी फार्म’या म्हशीच्या गोठ्यावर कामाला होता.

मात्र सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भीमकुमार यांचा मृतदेह महादेव तुकाराम शिंगारे यांच्या विहिरीच्या पाण्यात तरंगताना काही कामगारांना आढळून आला.

कामगारांनी या घटनेची तत्काळ माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, दौंडचे पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, पोलीस व नागरिकांनीलीस व नागरिकांनी भीमकुमार मृतदेह बाहेर काढला तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!