खेवलकरांच्या अडचणी वाढणार; फोनमध्ये अश्लील फोटो अन व्हिडिओ असल्याचा रूपाली चाकणकरांचा खळबळजनक दावा


पुणे: पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल केवलकर यांना अटक केली आहे. या प्रकरणात आता राज्य महिला आयोगानेही उडी घेतली आहे. या प्रकरणाचा महिलांची तस्करी या दृष्टीनेही तपास करावा अशी मागणी महिला आयोगाने पोलिसांकडे केली आहे. असे असतानाच आता राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ आहेत, असा खळबळजनक दावा केल्याने खळबळ उडाली

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे दावे केले आहेत.खेवलकरांच्या मोबाईलच्या व्हिडिओ फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले. 1497 फोटोही आहेत. मुलींचे अश्लील, फोटो व्हिडिओ आहेत. 234 फोटो व्हिडिओ अश्लील आहेत. मुलींना नशा देऊन लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ काढलेले आहेत. या व्हिडिओचा वापर मुलींना परत ब्लॅकमेल करण्यासाठी करण्यात आला, असेही गंभीर आरोप रूपाली चाकणकर यांनी केले आहेत.

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर, निखील पोपटाणी, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन भोबे, श्रीपाद मोहन यादव तसेच त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिला यांना पुण्यात ताब्यात घेण्यात आले होते. पार्टीच्या ठिकाणाहून 41 लाख 35 हजार किमतीचा कोकने, गांजा, दहा मोबाईल, हुक्का पॉट, दारुच्या बॉटल तसेच इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!