आपली स्वप्न बाजूला ठेवून वहिनीशी लग्न करून तिच्या जीवनाला बनला आधार, तरुणाचे होतंय कौतुक..


जळगाव : कोळपिंप्री (ता. पारोळा) येथील एका दिराने आपल्या विधवा वहिनीशी लग्न केले आहे. त्याने तिच्या जीवनाला आधार दिला आणि संपूर्ण जबाबदारी घेत तीन मुलांसाठी ‘बाप’ही झाला. यामुळे याची चर्चा सुरू आहे. नवदांपत्य राहुल विनोद काटे यांच्या पुरोगामी विचारांनी एक आदर्श घालून दिला आहे.

कुटूंबात गेल्या वर्षी कुटुंबाचा आधारवड असलेला युवा शेतकरी संभाजी काटे याचे हृदयविकाराने निधन झाले. ज्यावेळी संभाजीचे निधन झाले त्याच्या पश्चात विद्या व वैभवी या जुळ्या मुली तर पत्नी अनिता या सात महिन्याच्या गर्भवती होत्या.

दरम्यान, जन्म होण्यापूर्वीच त्या गर्भातील ‘बाळाचा बाप’ या क्रूर काळाने आपल्यातून हिरावून नेला होता. अशा वेळी लहान दीर राहुलने धीर दिला. त्यानंतर आठ महिन्यांपूर्वी अनिता यांनी बाळाला जन्म दिला.

भावाच्या निधनानंतर त्यांचं दुख पहावत नसलेल्या दिराने विधवा वहिनीला पुन्हा जगण्याचा आधार देण्यासाठी तयार झाला. मोठ्या मनाच्या तरुणाने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.

आपली स्वतःची भावी स्वप्ने बाजूला सारत राहुल काटे याने आपली विधवा वहिनी अनिता हिच्याशी आज कोळपिंप्री येथील भवानी मंदिर परिसरात नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विवाह केला. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!