केदारनाथ यात्रा आजपासून सुरू! भाविकांकडून हर हर महादेवाचा जयघोष


नवी दिल्ली : ढोलच्या गजरात भाविकांसाठी आज सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी केदारनाथ धामची कवाडं उघडण्यात आली आहेत. अनेकजण याची आतुरतेने वाट बघत होते. मंगळवारी २५ एप्रिल रोजी केदारनाथ धामची कवाडं उघडण्यात आली, त्यावेळी जवळपास ८ हजार भाविक इथे उपस्थित होते.

यात्रेसाची अनेकांनी बुकिंग करून ठेवले आहे. चारही बाजूला जय भोलेनाथ आणि हर हर महादेवच्या जयघोषात येथील परिसर दुमदुमून गेला. कडाक्याच्या थंडीतही इथे हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. केदारनाथ धाम ३५ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे.
सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी बर्फ देखील पडत आहे.
आता पुढील सहा महिन्यांपर्यंत भाविक येथे दर्शन घेऊ शकतात. दिवाळीपर्यंत आता मंदिर खुले राहील.
खराब हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने भक्तांना येथून पुढे जाऊ दिलं जात नाही. यामुळे हवामानाचा अंदाज आणि चौकशी करून याठिकाणी ट्रिप प्लॅन करून यावी.