Kangana Ranaut : ‘पंगा क्वीन’ करणार राजकारणात प्रवेश?, वडिलांनी केला मोठा खुलासा, म्हणाले..


Kangana Ranaut : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूड असो वा राजकारण, ती प्रत्येक गोष्टीवर अतिशय स्पष्टपणे आपले मत मांडते.तिने आपले बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केले आहे.

तिचे अनेक चित्रपट खूप गाजले आहेत. सोशल मीडियावर ती सतत सक्रिय असते. तिचे लाखो चाहते आहेत. परंतु, कंगना सतत वादग्रस्त वक्त्यावरून चर्चेत येत असते. त्यामुळे तिला टीकेला सामोरे जावे लागते. कंगना सोशल मीडियावर भाजप पक्षाच्या बाजूने पोस्ट करत असते.

मागील काही दिवसांपासून कंगना आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु होती. सतत समाजकारण आणि राजकारणावर वक्तव्य करणारी कंगना खरच आगामी निवडणूक लढवणार का? असा सवाल चाहत्यांना पडत होता. Kangana Ranaut

यावर आता कंगनाचे वडील अमरदीप रनौत यांनी मोठा खुलासा केला आहे. अमरदीप रनौत यांच्या माहितीनुसार, आगामी निवडणूक कंगना भाजपच्या तिकिटावर लढवणार आहे. कंगना कोणत्या मतदार संघातू निवडून लढवणार आहे हे अजून स्पष्ट झाले नाही.

पक्ष याबाबत निर्णय घेईल. दरम्यान, कंगनाने रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची कुल्लू मधील शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हापासून कंगना निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!