Kalicharan Maharaj : मुस्लिमांचे तळवे चाटतायेत, त्यांना खुश केलं जातंय आणि कातडी हिंदूंची सोलली जातेय, कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य..


Kalicharan Maharaj : विधानसभा निवडणुकीच्या मतदानास आता दोन दिवस राहिले आहे. प्रचाराचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी रॅली काढत आहे. प्रचाराच्या शेवटच्या काही तासात अनेक ठिकाणी उमेदवारांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

अशातच आता कालीचरण महाराज यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकारणाचा पारा वाढला आहे. शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी रविवारी कालीचरण महाराज यांनी सभा घेतली. छत्रपती संभाजीनगर येथे ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू मतांबद्दल मोठे भाष्य केले आहे.

हिंदू व्होट बँकांची क्रांती पाहिजे, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले, असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलंय. यानंतर त्यांनी त्यांच्या आक्रमक भाषणाचा धडाका सुरू ठेवत थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीकेची तोफ फिरवली. Kalicharan Maharaj

कालीचरण महाराज यांनी जरांगे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आता एक आंदोलन सुरु झालं होतं माहिती आहे ना, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्यांनी थडग्यावर चादर चढवली.

यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस, अशा शब्दात कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे यांना टार्गेट केले आहे.

तसेच, हिंदू आणि मुस्लिम मतांबद्दलही त्यांनी मोठं भाष्य केलं. मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण ते मतदानात सहभागी होतात. मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात. सर्व आमदार-खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात.

मी तुम्हाला तुकडे टाकेल, मग लाडकी बहीण योजना, रोजगार देऊ, असे तुकडे टाकून तुम्हाला खुश ठेवू असे राजकीय पक्ष करतात. फुकटात वापरणाऱ्या लोकामध्ये सर्वात जास्त मुस्लिम आहेत आणि कातडी मात्र हिंदूंची सोलली जाते. असे कालीचरण महाराज सभेत म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, जो हिंदू हितकी बात करेंगा त्यालाच मतदान करा असे आवाहन देखील कालीचरण महाराज यांनी सभेत उपस्थित मतदारांना केलं. जेवढे मुसलमान एरिया आहे तिथे पाकिस्तान बनलं आहे. जागोजागी पाकिस्तान बनला आहे.

त्यामुळे १०० टक्के अहिंसा शक्य नाही. हिंसा करावीच लागते, असं म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील धर्म रक्षणासाठी राक्षस मारले, असं कालीचरण महाराज म्हणाले. हिंदू लोक मतदानालाच जात नाही, मग राजा कोण येणार, तर मुसलमानाचे पाय चाटणारा, हिंदू मतदान करतील तर हिंदू कट्टर राजा बसेल, असंही कालीचरण महाराज म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!