Junnar News : मांडवी नदीत बुडून ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, जुन्नर येथील दुर्दैवी घटना..

Junnar News : ओतूर (ता. जुन्नर) येथील मांडवी नदी तीरावर खेळत असलेल्या ८ वर्षे वयाच्या मुलाचा अचानक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना मंगळवारी (ता . २२) घडली. सार्थकच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सार्थक शिंदे (वय ८) असे चिमुकल्याचे नाव आहे.
सवसितर माहिती अशी की, ओतूर येथील मांडवी नदी के.टी. बंधारा येथे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सानिका अमोल कोकाटे ही महिला कपडे धुण्यासाठी आली होती. यावेळी त्यांचा भाचा सार्थक शिंदे हा देखील आला. इतर मुलांसोबत तो खेळत होता.
दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सार्थक दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला; मात्र सार्थक कुठेही आढळून आला नाही. तो घरी आला की नाही याबाबत घरी फोन करून चौकशी केली असता तो आला नसल्याचे सानिका यांना सांगण्यात आले. त्यामुळे सर्वजण नदीवर त्याचा शोध घेत होते. unnar News
दरम्यान नदीकाठी सार्थकची चप्पल आढळून आली. त्यामुळे सार्थक वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. नातवाईक व ग्रामस्थानी पोलिसांना कळवले. लागलीच ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे घटनास्थळी पोहोचले.
पोलीस आणि ग्रामस्थांनी नदीपात्रात शोध घेतला, मात्र तिथे सार्थक मिळाला नाही. अखेर बुधवारी (ता.२३) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास सार्थक याचा मृतदेह नदीपात्रात पुलाखाली ग्रामस्थांना आढळला. या घटनेचा तपास ओतूर पोलिस करीत आहेत.