Junnar Leopard Attack : चार वर्षाचा मुलगा अंगणात खेळत होता, अचानक आई-वडिलांसमोरच बिबट्याचा हल्ला अन्…: जुन्नरमध्ये थरारक घटना

Junnar Leopard Attack : पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसत आहे. अशातच एक घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

आयुष शिंदे असे या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, जुन्नर येथील उंब्रज येथे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आयुष सचिन शिंदे हा आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना शेजारच्या उसाच्या शेतातून बिबट्या बाहेर आला आणि त्याने हल्ला केला.

आयुषच्या आई-वडिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या जखमी मुलाला सोडून पळून गेला.या हल्ल्यात आयुषच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर आळे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Junnar Leopard Attack

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुष आणि त्याच्या कुटुंबीयांची रुग्णालयात भेट घेऊन हल्ल्याची माहिती गोळा केली. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा दावा आयुष शिंदेच्या वडिलांनी केला आहे.