जून कोरडाच गेला आता जुलैमध्ये कसा असणार पाऊस? हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती…


पुणे : मान्सूनने यावर्षी नियोजित वेळेपेक्षा चांगलीच वाट पाहायला लावली, पण उशिराने का होईना आगमनानंतर पाऊस चांगलाच बरसत आहे. जूनच्या अखेरीस आगमन झालेला मोसमी पाऊस जुलै महिन्यात कसा असेल याचा अंदाज हवामान खात्याने नुकताच वर्तवला आहे.

संपूर्ण देशभरात जुलै महिन्यात पाऊस सामान्य असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार या पावसाचे प्रमाण सरासरी ९४ ते १०६ टक्के असेल. बीपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर झाला आणि तो चांगलाच लांबला.

मध्य भारत, दक्षिण व पूर्व भारत, ईशान्य बारत तसेच वायव्य भारताच्या काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर वायव्य, नैऋत्य, अग्नेय तसेच दक्षिण भारतात सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान , महाराष्ट्रात दरवर्षी साधारण ७ जुलै रोजी मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होते. पण यंदा बिपॉरजॉय चक्रीवादळामुळं मॉन्सूनच्या स्थितीवर परिणाम होऊन तो लांबला. त्यानंतर २३ जून पासून तो राज्यभरात सक्रीय झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!