‘त्या’ पत्रकाराला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; महिलेचा विनयभंग करून दिली होती धमकी

लोणी काळभोर : दाखले काढून देण्याच्या बहाण्याने ९१ हजार रुपये घेऊन तसेच महिलेचा विनयभंग करणार्या पत्रकाराला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हनुमंत राजकुमार सुरवसे असे अटक केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. हिंजवडीतील एका ४९ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या दोन मुलांचे शाळेचा दाखल काढून देण्यासाठी सुरवसे याने ९१ हजार रुपये घेतले, मात्र त्यांना शाळेचा दाखला काढून दिला नाही. त्यामुळे फिर्यादी कदमवाक वस्तीत आल्या, त्यांनी सुरवसे याला पैशांबाबत विचारले. मात्र त्याने शिवीगाळ केली.
दरम्यान , त्याने मी पत्रकार आहे. माझे कोणी वाकडे करु शकणार नाही, असे म्हटले. तसेच त्यांच्याबर गैरकृत्य केले. त्यानंतर महिलेने लोणी काळभोर ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी सुरवसे याला अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.