Jobs : नोकरीच्या शोधात आहात? मग ही आहे कामाची बातमी, १० वी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरी, मध्य रेल्वेत मेगा भरती, येथे करा अर्ज..


Jobs : मित्रानो आपण जर नोकरीच्या शोधात असाल आणि नोकरी मिळत नाही ह्याच टेन्शन मध्ये असाल तर हीच वेळ आहे टेन्शन दूर कण्याची. कारण लवकरच मध्य रेल्वेत मेगा भरती होणार आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी बंपर भरती जारी केली आहे.

रेल्वेतील या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १५ डिसेंबर २०२३ ला सुरू झाली. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १४ जानेवारी २०२४ आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या wcr.Indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येऊ शकतो. पश्चिम मध्य रेल्वेच्या भरती मोहिमेद्वारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी तब्बल ३०१५ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

जेबीपी डिव्हीजन: ११६४ पदे बीपीएल डिव्हीजन : ६०३ पदं कोटा डिव्हीजन : ८५३ पदं सीआरडब्ल्यूएस बीपीएल : १७० पदं डब्ल्यूआरएस कोटा : १९६ पदं मुख्यालय/जेबीपी : २९ पदे Jobs

शैक्षणिक योग्यता..

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी किंवा शिकाऊ उमेदवारांसाठी, किमान ५० % गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, एखाद्याने NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून ITI केलेले असावे.

वयोमर्यादा किती ?

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या भरतीसाठी वयोमर्यादा १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल. SC/ST उमेदवारांना ५ वर्षांची सूट मिळेल आणि OBC ला तीन वर्षांची सूट मिळेल.

दिव्यांग उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत १० वर्षांची सूट मिळेल. SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना १५ वर्षांची सूट आणि OBC प्रवर्गातील अपंग उमेदवारांना १३ वर्षांची सूट मिळेल.

सिलेक्शन कसं होणार ?

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या भरतीसाठी १०वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. दोन्हीचे गुण जोडून मेरिट तयार केली जाईल. मेरिट लिस्ट ट्रेड, डिवीजन/यूनिट आणि कम्युनिटी नुसार बनवली जाईल.

अर्जाचे शुल्क किती ?

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये होणाऱ्या या भरतीसाठी जो अर्ज भरावा लागेल, त्याचे शुल्क अथवा फी ही १३६ रुपये आहे. तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३६ रुपये आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!