हडपसरमध्ये बसमध्ये महिलेच्या पर्समधून दोन लाखांच्या दागिन्याची चोरी….!


पुणे : गाडीतळ हडपसर पीएमपीएमएल च्या बस प्रवासात एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोराने तब्बल दोन लाखाचे दागिने लंपास केले आहेत. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे प्रवास करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

याबाबत शेवाळवाडीत राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने ही तक्रार दिली आहे. यामध्ये सोन्याची चोरी केल्याचे म्हटले आहे. ही महिला ५ मार्च रोजी बस प्रवास करत असताना बसचा CNG संपल्याने त्या खाली उतरल्या.

नंतर त्यांच्या लक्षात आले की कोणी तरी भामट्याने पर्सची चेन उघडून दागिने पळविले आहेत. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. नंतर त्यांनी पोलीसांकडे धाव घेतली, आणि माहिती दिली.

पोलीस अंमलदार जी बी क्षीरसागर (8380097866) या चोराचा शोध घेत आहेत. यामुळे जर तुम्ही देखील पुण्यात सार्वजनिक ठिकाणी प्रवास करत असाल तर काळजी घ्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!