जेरुसलेममध्ये प्रार्थना स्थळावर गोळीबार ; 8 ठार
दहशतवादी हल्ला करणारे मारेकरीही ठार
जेरुसलेम : इस्रायलची राजधानी जेरुसलेमच्या बाहेरील नेवे याकोव्ह स्ट्रीटवरील प्रार्थनास्थळावर शुक्रवारी गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. इस्त्रायली बचाव सेवेने सांगितले की, जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळावर गोळीबार झाला होता. या घटनेतील मृतांची संख्या आठ झाली असून सुमारे 10 जण जखमी झाले आहेत.
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
अधिकृत निवेदनानुसार ही घटना रात्री 8:15 वाजता (स्थानिक वेळेनुसार) घडली. गोळीबार हा दहशतवादी हल्ला आहे: पोलिस पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैन्याने 10 लोक मारल्याच्या एका दिवसानंतर हा हल्ला झाला आहे. हा गोळीबार ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पूर्व जेरुसलेमच्या उत्तर भागात शुक्रवारी संध्याकाळी गोळीबार झाल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी बंदुकधारी ठार केले
पोलिसांनी सांगितले की दहशतवादी कारमध्ये आले आणि पूर्व जेरुसलेमच्या उत्तरेकडील भागात एका शेजारच्या प्रार्थनास्थळ म्हणून वापरल्या जाणार्या इमारतीवर गोळीबार केला. पोलिसांनी बंदूकधाऱ्याला शोधून त्याला गोळ्या घातल्या. हल्ल्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मॅगेन डेव्हिड अॅडॉम (एमडीए) बचाव सेवेने सांगितले की त्यांच्या डॉक्टरांनी पाच बळींना घटनास्थळी मृत घोषित केले. एमडीए कर्मचार्यांनी सांगितले की 70 वर्षीय महिला आणि 20 वर्षीय पुरुषाची प्रकृती गंभीर आहे आणि 14 वर्षांच्या मुलाची प्रकृती मध्यम आहे. जखमींना हडसाह माउंट स्कोपस रुग्णालयात नेण्यात आले.