पुढचा नंबर जयंत पाटलांचा? आता ईडीकडून चौकशी, कार्यकर्ते झाले आक्रमक…
पुणे : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची सोमवारी ईडी कार्यालयात चौकशी केली जाणार असून, आयएल अँड एफएस प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवणार आहे. मात्र, याप्रकरणाशी आणि आपला काहीच संबंध नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
तसेच जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात समोवारी (ता. २२) मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलनावर बसले आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. तर बरेच पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी ट्विटरवरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईला येऊ नये असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांकडून बॅरीकेटिंग करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमीका घेतली असून ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणा करण्यात येत आहे.