Jalgaon News : राज्यात वादळी वाऱ्याचा कहर! घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू… 


Jalgaon News : गेल्या आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसासह वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे.

तसेच काल पाऊस आणि वादळी वाऱ्याने जळगाव जिल्ह्यात अवकाळी एकच दाणादाण उडवली आहे. अचानक आलेल्या या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे एक घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मृतांमध्ये पती-पत्नी, लहान मुलगी आणि वृद्ध महिलेचा समावेश आहे. सुदैवाने या घटनेतून ४ वर्षांचा चिमुकला थोडक्यात बचावला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या अंबापाणी गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Jalgaon News

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबीय रविवारी रात्रीचे जेवण करून घरात झोपले होते. त्याचवेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अचानक घर कोसळलं.

या घटनेत घरातील चौघेजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. नशीब बलवंत्तर असल्याने या घटनेत ४ वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचले. मात्र, या घटनेत अख्खं कुटुंबच संपलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!