किसी के हाथ ना आयेगी…, रिमझिम पावसात वेड लावतोय नवनीत राणांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल..

मुंबई : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा या सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. अशातच त्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राणा यांचा एका गाण्यावरील डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

‘किसी के हात ना आयेगी ये लडकी…’ या लोकप्रिय हिंदी गाण्यावर नवनीत राणा यांनी ठेका धरला असून, त्यांच्या डान्समधील उत्साह लक्षवेधी ठरला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नवनीत राणा हातात छत्री घेऊन डान्स करताना दिसत आहेत.
डान्स दरम्यान नवनीत राणा यांचा आत्मविश्वास, हावभाव आणि हटके स्टेप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या हटके डान्सचं जोरदार कौतुक होत आहे.

काही चाहत्यांनी तर त्यांच्या या डान्सची तुलना बॉलिवूडच्या अभिनेत्रीला टक्कर देणारा डान्स अशी म्हणत केली आहे. राजकारणात सक्रिय असलेल्या नवनीत राणा यांचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांसाठी नक्कीच एक खास आकर्षण ठरला आहे.
त्यांच्या या हटके अंदाजाने नेटकऱ्यांना आकर्षित केले आहे. नेहमी राजकीय व्यासपीठांवर गंभीर आणि आक्रमक भूमिकेत दिसणाऱ्या नवनीत राणा यांना अशा वेगळ्या आणि उत्साही अंदाजात पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.