पुण्यात चार दिवस पावसाची शक्यता, शहरात गार वारे…
पुणे : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची हालचाल सुरू झाली असून, ते 6 मे पासून सक्रिय होत आहे. त्यामुळे पुणे शहरावरही दुपारनंतर ढगांची गर्दी झाली. शहरात गार वारे वाहत आहे. तसेच पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शहरावर असलेल्या ढगांच्या गर्दीमुळे तापमानात दोन अंशांनी घट झाली. यामुळे कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पाऊस पडल्याने गारवा निर्माण झाला आहे.
कमाल तापमान 36 वरून 34 अंशांपर्यंत खाली आले आहे. आर्द्रताही 60 टक्यांवर गेल्याने गारठा अधिकच वाढला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आगामी पाच दिवस शहरात पावसाची शक्यता आहे. यामुळे बाहेर पडताना अंदाज घेऊन पडावे.
9 मेपर्यंत सायंकाळी हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसेच राज्यात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.