केदारनाथ मंदिरासमोर प्रपोज करणं पडलं महागात, मंदिर समितीने घेतला मोठा निर्णय…


पुणे : पवित्र चार धामांमधील सर्वात लोकप्रिय असलेलं केदारनाथ हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंदिर परिसरात व्हिडीओ आणि रिल्स बनवण्यावर बंदी घातली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियामुळे केदारनाथ लोकांच्या मनांत भिनलं आहे. प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा केदारनाथला जाण्याची इच्छा नक्कीच असते. उत्तराखंडमधील केदारनाथ अनेक श्रद्धांळूंसाठी आस्थेचे स्थान आहे. पण, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी केदारनाथ व्ह्युज आणि लाईक्स मिळवण्याचं एक माध्यम बनलं आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने नवा आदेश जारी केला आहे.

केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये प्रसिद्ध ब्लॉगर विशाखा केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज करताना दिसत आहे.

 

हा व्हिडीओ समोर आल्यावर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. या व्हिडीओमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मंदिरासमोर प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे.

कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ शूट करण्यावर बंदी

बद्रीनाथ-केदारनाथ धाममध्ये कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ शूट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने एक आदेश जारी केला आहे, यानुसार मंदिर प्रशासनाकडून धाममध्ये यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ शूट करण्यावर कारवाई करण्यात येईल.

समिती आता केदारनाथ मंदिरात मोबाईल फोनवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. मोबाईल बंदी लागू झाल्यास येथे येणारे भाविक मंदिराच्या आत मोबाईल घेऊन जाऊ शकणार नाहीत किंवा व्हिडीओ बनवू शकणार नाहीत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!