लग्नाला तीन महिने झाले पण पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार! कारण ऐकून पोलीसही हादरले..
पुणे : देशात लग्नात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. आता देशातील काही भागात हुंड्याची प्रथा सुरू आहे. उत्तरप्रदेश मध्ये एक हुंडाबळी संबंधित घटना समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
दहा लाखांचा हुंडा दिल्याशिवाय पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणार नाही. अशी धक्कादायक अट एका नवविवाहित पुरुषाने ठेवली आहे. यामुळे या पतीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
दोन्ही कुटुंबामध्ये १० लाखांच्या हुंड्याची बोली झाली होती. मात्र पीडितेच्या घरच्यांना एवढे पैसे देणे शक्य झाले नाही. यामुळे तिच्या पतीने लग्नाला तीन महिने उलटून सुद्धा शारीरिक संबंध ठेवले नाहीत.
दोघे हनिमून साठी नैनितालला गेले होते. मात्र येथे सुद्धा पती नववधूपासून लांब राहिला. याठिकाणी त्याने वधूचे काही अश्लील फोटो देखील काढले. तसेच हे फोटो दाखवून धमकी देखील देऊ लागला. यानंतर मात्र पत्नीने पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली आहे.