Israel vs Hamas War : इस्राइल-हमास युद्धाचा मोठा परिणाम, गाझामधील विस्थापित लोकांची संख्या ४,२३,३७८ वर, लाखो घरे उध्वस्त..


Israel vs Hamas War : इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज सातवा दिवस असून इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्ध तीव्र होत आहे. या युद्धाचे अनेक देशांवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. Israel vs Hamas War

तसेच यावेळी युनायटेड नेशन्स (UN) माहिती दिली आहे की गाझा पट्टीतील ४२३,००० हून अधिक लोकांना आता त्यांची घरे सोडून पळून जावे लागले आहे, कारण इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर बॉम्बफेक सुरू ठेवली आहे. लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

एएफपीच्या अहवालानुसार, संयुक्त राष्ट्र मानवतावादी एजन्सी ओसीएचएने शुक्रवारी एका निवेदनात सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गाझामधील विस्थापित लोकांची संख्या ८४,४४४ ने वाढून ४२३,३७८ झाली आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 1,300 हून अधिक इस्रायली ठार झाले असून त्यात नागरिक आणि सैनिकांचा समावेश आहे.

त्याच वेळी, ३ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर गाझामध्येही इस्रायलच्या हवाई हल्ल्यात १५०० हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर हमासने १५० हून अधिक इस्रायली लोकांना आणि काही परदेशी लोकांना ओलिस बनवून गाझा पट्टीतील बोगद्यांमध्ये ठेवले आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. इस्रायलने केलेल्या प्रत्येक हवाई हल्ल्याचा बदला म्हणून हमासने प्रत्येक ओलीस ठार मारण्याची धमकी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!