Israel vs Hamas War : इस्राईल-हमास युद्धाचा परिणाम भारतावर होणार, महागाई पुन्हा घेणार गगनभरारी..


Israel vs Hamas War : इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील उद्योगांवर होत आहे. भारत आणि इस्रायलमध्ये अतिशय मजबूत असे व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे या युद्धाने भारताचे अब्जावधी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

इस्राईलमधील युद्ध असेच सुरू राहिल्यास उद्योगांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या मागण्या थांबतील. या दोन देशांतील युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास या क्षेत्रांत काम करणाऱ्या हजारो लोकांचा रोजगारही धोक्यात येईल.

या युद्धाचा परिणाम भारतातील उद्योगांवर होत असून वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ आणि हस्तकला उद्योगांच्या वस्तूंचा पुरवठा गुरुग्राम येथून केला जातो. उड्डाणे रद्द झाल्यामुळे कोट्यवधींचा माल पाठवण्याबाबत उद्योजकांची चिंता वाढली आहे.

जर इसायल आणि हमासमधील युद्ध दीर्घकाळ सुरू राहिले, तर भारताच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसू शकतो. भारत आणि इस्रायलदरम्यान अब्जावधी डॉलर्सचा व्यापार होतो.

त्यामुळे युद्ध लांबले, तर त्याचा व्यापारावर दुष्परिणाम होऊन अब्जावधी रुपयांचे नुकसान होऊ शकते. युद्धामुळे भारताच्या आयात-निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशात महागाई वाढू शकते. परिणामी पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकू शकतात.

भारत आणि इसायलमध्ये केवळ राजनैतिकच नव्हे, तर व्यापारी संबंधही मजबूत आहेत. भारताशी इस्त्रायलचा व्यापार १० अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक आहे. निर्यात ८.५ अब्ज डॉलर्सची, तर आयात २.३ अब्ज डॉलर्सची आहे.

भारताचे बडे उद्योगपती गौतम अदानी यांनीही तिथे मोठी गुंतवणूक केली आहे. इस्रायलमधील सर्वात मोठे बंदर ‘हाईफा पोर्ट’ साठी अदानी पोर्ट आणि गडोट यांच्यामध्ये १.१८ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे.

इसायलकडून शस्त्रास्त्रे खरेदी करणाऱ्या देशांमध्ये भारत मोठा खरेदीदार देश आहे. भारत इस्त्रायलकडून मोती, हिरे, दागिने, खते, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, सुटे भाग आणि कच्चे तेल खरेदी करतो.

तसेच हिरे, ज्वेलरी, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंगशी संबंधित वस्तू विकतो. भारतीय व्यापाऱ्यांनीही इसायलमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे जर युद्ध लांबले, तर आयात-निर्यातीलाही फटका बसू शकतो व त्यामुळे भारताचे नुकसान होऊ शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!