ठाकरे बंधुंमध्ये पुन्हा बिनसलं? मुंबई प्रभाग समिती निवडणूकीसाठी मनसे तटस्थ, महायुतीला फायदा?


मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत जवळपास वीस वर्षानंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पुन्हा एकदा मिठाचा खडा पडल्याची चर्चा आता रंगली आहे.या महानगरपालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत आता मोठी राजकीय घडामोड घडतं आहे. प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरले जात असतानाच, मनसेनं या निवडणुकीत ‘तटस्थ’ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीला याचा मोठा फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीसाठीचा उद्धव ठाकरेंनी दिलेला अध्यक्षाचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला आहे. स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरेसेनेनं मनसेची अपेक्षा पूर्ण न केल्याने राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे प्रभाग समिती निवडणुकीत राज ठाकरेंनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरेसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन स्वीकृत नगरसेवक नियुक्त झाले आहेत. यामध्ये मनसेला डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे आता नाराज झालेल्या मनसेने मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रभाग समिती निवडणुकीत बहुमतासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असताना, मनसेने घेतलेल्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!