इराण -इस्त्राईल संघर्षाचा भडका ; महाराष्ट्रातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर, मुख्यमंत्र्यांनी महाजनांकडे सोपवली जबाबदारी..


पुणे : गेल्या चार दिवसांपासून अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता इतर देशांवर उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातील अनेक नागरिक हे दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलर्ट मोडवर आले असून त्यांच्या कार्यालयाकडून भारतीयांना परत आणण्यासाठी मोठी पावले उचलली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विविध यंत्रणांशी नियमित संवाद साधत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे.त्यानुसार 971503654357 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

इस्त्राईल आणि इराणच्या युद्धाने दुबई विमानतळाच्या परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील तातडीने रद्द करण्यात आली. यामध्ये भारताच्या विविध शहरात जाणारे शेकडो प्रवासी विमानतळावरच अडकून पडले.या अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

दरम्यान केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने हा व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!