महाराष्ट्राचा कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी हरपला!! IPS सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन, देवदर्शनाला जात असताना काळाची झडप…


मुंबई : मुंबई पोलिस दलात एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील आयपीएस (IPS) अधिकारी डॉ. सुधाकर पठारेंचे अपघाती निधन झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवदर्शनासाठी श्रीशैलम येथेून नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला.

यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारची ट्रकसोबत धडक झाली आणि हा भीषण अपघात झाला. पठारे हे सध्या मुंबई पोलिस दलात पोर्ट झोनचे पोलिस उपायुक्त म्हणून काम करत होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत तपास सुरू आहे. तेलंगणा पोलिसांनी या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना कळवली आहे.

सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैद्राबादला गेले होते. तेथून ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. त्यांच्यासोबत असलेल्या अजून एकाचाही यात मृ्त्यू झाला आहे. पठारे हे २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. पोलिस दलात विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

दरम्यान, त्यांनी अधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक शहरात अधिकारी म्हणून आपली छाप पाडली होती. पठारे यांनी संघटित गुन्हेगारीविरोधात मोक्का, तडीपारी अशा प्रतिबंधात्मक कारवाई केल्या होत्या. कायदा सुव्यवस्थेसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. त्यांच्या जाण्याने दुःख व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, आयपीएस डॉ. सुधाकर पठारे हे अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील वाळवणेचे रहिवासी होते. त्यांनी एम. एस्सी.अग्री, एलएलबी केले होते. शासनाच्या अनेक खात्यांमध्ये ते अधिकारी राहिले होते. तसेच राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी सेवा केली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!