पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्यधिष्ठीत आधारीत व्यावसायिक आभ्यासक्रमाचे शिक्षण मिळणार! दौंड तालुक्यात रायसोनी ग्रुपकडून स्किल टेक युनिव्हर्सिटी यंदाच्या वर्षापासून सुरू होणार…

उरुळीकांचन : जगभरात किमान कौशल्य आधारीत मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता विद्यार्थ्यांना किमान कौशल्य शिक्षणाच्या निगडीत व्यावसायिक आभ्यासक्रमात पुढे येणारी संधी लक्षात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेक्निकल शिक्षणाची गरज एका विद्यापीठाच्या स्थापनेमुळे पूर्ण होणार आहे. पुणे जिल्ह्यात हे आंतरराष्ट्रीय कौशल्यधिष्टीत आभ्यासक्रमाचे विद्यापीठ सुरू होणार असून या शिक्षणातून विद्यार्थी ते इंडस्ट्रीज अशी मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठ मौलाचा दगड ठरणार असून या विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष यंदा सुरू होणार असल्याने ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचा किमान
कौशल्य आभ्यास क्रमाची संधी मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथील पूर्वश्रमीचे सुभाष आण्णा कुल इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागेत या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी (विद्यापीठ ) नव्याने सुरुवात होत आहे. हे विद्यापीठ जागतिक पातळींवर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बदलांनुसार तसेच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने कौशल्यधिष्टीत उपक्रम सुरू करीत आहे. या विद्यापीठातून कमी शुल्कात नावीन्यपूर्ण शिक्षणाची संधी इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, सायन्सेस, स्किल्स अँड डेव्हलपमेंट, वीगल स्टडीज अशा पध्दतीच्या विविध शैक्षणिक शाखा सुरू होऊन पीएचडी अभ्यासक्रमांचीही सुरुवात करण्यात येणार आहे.
केडगाव येथील संकुल जूनपासून सुरू..
जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीचा अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांनी युक्त शैक्षणिक संकुल केडगाव येथे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. साधारण ३७ एकर परिसरात शैक्षणिक संकुलाची निर्मिती होत आहे. या संकुलात ग्रंथालय, प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, कम्प्युटर लॅब, क्रीडांगण, रिसर्च सेंटर, इन्क्युबेशन सेंटर, प्लेसमेंट सेल आदींची उभारणी पूर्ण झाली आहे. येत्या जूनपासून या शैक्षणिक संकुलात कामकाज चालणार आहे, अशी माहिती युनिव्हर्सिटीकडून देण्यात आली आहे.
विद्यापीठात असणार कोर्सेस..
सध्या विद्यापीठात बीटेक कोर्सेस कम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, एआय, सायबर सिक्युरिटी, कम्प्युटर सायन्स अशा १० विषयांमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बीबीए, बीसीए, एमसीए, एमबीए अशा अभ्यासक्रमांचे शिक्षणही दिले जाणार आहे. आगामी काळात लॉ शाखेतही कौशल्यांवर आधारित शिक्षण देण्यासोबतच, बीएस्सी इन एआय, डेटा सायन्स आदींमध्ये सुरू करण्यात येणार आहे.