धनंजय मुंडे यांच्या जागी बीडमधील आमदारालाच मिळणार मंत्रीपद?, महत्वाची माहिती आली समोर…

बीड : मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता आणि प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोण मंत्री होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच मराठा आमदाराला मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यताही वर्तविली जातेय
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. अखेर ८२ दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे पाहायला मिळाले.
धनंजय मुंडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर आता मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि मनोज जरांगेंकडून केली जात असताना आता धनंजय मुंडे यांच्या जागी बीड जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील धक्कादायक छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे नाव समोर आले. त्यामुळे विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.
दरम्यान, अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकल्याने धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आहे.दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी विधानभवनात पार पडणार असून, धनंजय मुंडेंशिवाय ही पहिलीच बैठक असणार आहे.