‘कोयता गॅंग पकडा बक्षीसे मिळवा’ पुणे पोलिसांची अभिनव योजना…!

पुणे : पुणे शहराची विद्येचे माहेरघर अशी ओळख आहे. अशा पुण्यात गेले काही महिन्यात गुन्हेगारांचं आणि गुन्हाच प्रमाण सर्वधिक झालं आहे. अशातच वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखी योजना हाती घेतली आहे. गुंडांना पकड़ा आणि बक्षीस मिळवा अशी ही योजना आहे.
कोयता गॅगच्या गुंडांनी तर घुमाकूळ घातला असून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र यात पोलिसांना अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता एक अनोखी योजना सुरू केली आहे.
दरम्यान, पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी कारवाई केल्यास बक्षीस स्वरूपात काही रक्कम देण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम आणि पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तानी ही बक्षीस योजना जाहीर केली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी देण्यात येणार बक्षीशे :
१) शस्त्र अधिनियम कलम ३, २५ नुसार कारवाई केल्यास १० हजार रुपये.
२) शस्त्र अधिनियम कलम ४, २५ नुसार कारवाई केल्यास ३ हजार रुपये.
३) फरार आरोपीला पकडल्यास १० हजार रुपये.
४) पाहिजे आरोपीला पकडल्यास ५ हजार रुपये.
५) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधि. मोका कारवाई केल्यास ५ हजार रुपये.
६) महा धोकादायक व्यक्ती इ. चे विघातक कृत्यांना आळा घालणाच्या ५ हजार रुपये.
७) महा पोलीस कायदा कलम ५५ नुसार कारवाई केल्यास दोन हजार रुपये.
८) महा पोलीस कायदा कलम ५६/५७ नुसार कारवाई केल्यास १ हजार रुपये.