पुण्यात शिक्षकाचा संतापजनक प्रकार, विद्यार्थ्यांना जबर मारहाण, खायला लावल्या तिखट मिर्च्या अन्…

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीणगाव जिल्हा परिषद शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शाळेतील मुलांना जबर मारहाण करून तिखट मिर्च्या खायला दिल्याचा आरोप पालकांनी शिक्षकावर केला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून यावर रोष व्यक्त केला जात आहे.
माळीणगावातील जिल्हा परिषद शेळतील शिक्षक राहुल हिवरे यांनी शाळेतील मुलांना मारहाण करून तिखट मिर्च्या खायला दिल्याचा आरोप पालकांनी शिक्षकावर केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, शिक्षणाच्या ज्ञानमंदिरात जिल्हा परिषद शिक्षक राहुल हिवरे यांनी चिमुकल्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच वडापाव खाऊन उरलेल्या गरम मिर्च्या मुलांना खाव्या लागल्या. हे प्रकरण इथेच थांबले नाही. मुलांच्या दप्तरात पौष्टिक भात ठेवला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यामध्ये गुरु-शिष्याप्रमाणे नाते असते. चुकल्यावर कान धरणारा आणि जिंकल्यावर शाबासकी देणारा हा शिक्षकच असतो. मात्र माळीणगावातील जिल्हा परिषद शेळतील शिक्षक राहुल हिवरे यांनी तर कहरच केला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून यावर रोष व्यक्त केला जात आहे.