भारताच्या अगदी शेजारच्या ‘या’ देशात दुबईपेक्षा स्वतात मिळतंय सोनं, जाणून घ्या…

नवी दिल्ली : भूतानमध्ये सोन्याचे दर तुलनेने खूपच कमी आहेत, आणि याला अनेक कारणे आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भूतानमध्ये सोन्यावर कोणताही कर आकारला जात नाही. भारतात आणि इतर देशांमध्ये सोन्यावर विविध प्रकारचे कर आणि आयात शुल्क लावले जाते, त्यामुळे ते महाग होते.
मात्र, भूतानमध्ये करमुक्त सोने उपलब्ध असल्यामुळे त्याचे दर स्वस्त राहतात. याशिवाय, भूतानमध्ये सोन्यावरील आयात शुल्कही अत्यंत कमी आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत येथे सोनं स्वस्त मिळते.
भूतान आणि भारताच्या चलनाच्या मूल्यात फारसा फरक नाही, त्यामुळे भारतीयांसाठी येथे खरेदी करणे अधिक फायद्याचे ठरते. तसेच, भूतानमधील सोन्याचे दर दुबईच्या तुलनेत ५ ते १० टक्के कमी असतात. त्यामुळे भारतीय ग्राहकांसाठी भूतानमधून सोने खरेदी करणे अधिक परवडणारे आहे.
भूतानमध्ये किमान एक रात्र मुक्काम करावा लागतो. पर्यटकांना सरकारने प्रमाणित केलेल्या हॉटेलमध्ये राहणे अनिवार्य आहे.
सोने खरेदीसाठी अमेरिकन डॉलरने पैसे द्यावे लागतात. भारतीय चलन स्वीकारले जात नाही.
शाश्वत विकास शुल्क भरावा लागतो. भारतीयांसाठी हा शुल्क प्रति व्यक्ती ₹१, २०० ते ₹१,८०० प्रतिदिन आहे.
फक्त सरकारी ड्युटी-फ्री दुकानांमधूनच सोने खरेदी करता येते. ही दुकाने भूतानच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत असतात.
सोने खरेदी करताना अधिकृत पावती घ्यावी लागते, अन्यथा सीमा पार करताना अडचण येऊ शकते.
दरम्यान, भारतीय नागरिकांसाठी भूतानमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसाची गरज नाही. तुम्ही पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र (Voter ID) दाखवून प्रवेश करू शकता. त्यामुळे दुबईसारख्या ठिकाणी व्हिसा, विमानभाडे आणि इतर खर्च करण्याऐवजी भूतानमधून सोने खरेदी करणे जास्त सोयीचे आणि परवडणारे ठरू शकते.