Indapur News : इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता अडकला, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, चर्चा सुरू…


Indapur News इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे खास समर्थक असलेले इंदापूरमधील नेते दीपक जाधव यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

याप्रकरणी सुभाष अर्जुन मिसाळ यांनी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. दीपक जाधव यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Indapur News

विनाताबा साठेखत करून घेतलेल्या जमिनी व्यतिरिक्त अधिकच्या जमिनीत बेकायदेशीर उत्खनन केल्यावर शेत जमिनीच्या मालकाने याबाबत विचारणा केली असता त्यास जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते दीपक जाधव यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बारामतीच्या सत्र न्यायालयाने दिपक जाधव यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. ७ ऑक्टोबर रोजी याची सुनावणी आहे.  इंदापूर तालुक्यातील वजनदार नेते म्हणून दीपक जाधव यांची ओळख आहे.

दरम्यान, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू असून याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!