Indapur : संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर भरधाव गाडीचा टायर फुटला, अपघातात इंदापूरच्या काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू…


Indapur : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची घटना बारामतीमधून समोर आली आहे. आदित्य आबासाहेब निंबाळकर असे याचे नाव असून तो इंदापूरच्या काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे.

आदित्य आबासाहेब निंबाळकर असे या मुलाचे नाव असून तो इंदापूरच्या काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे.

सविस्तर माहिती अशी की, आज संध्याकाळी चारच्या सुमारास बारामती तालुक्यातील रुई गावच्या पाटीनजीक हा अपघात घडला. आदित्य हा काटेवाडी कडून रुई मार्गे बारामतीत येत होता त्याच्या चार चाकी गाडीचा टायर फुटल्याने गाडी पलटली व ती एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली.

आदित्य हा इंदापूर तालुका काँग्रेस पदाधिकारी आबासाहेब बापूराव निंबाळकर यांचा मुलगा असून त्याच्या निधनाने सणसर या गावात शोककळा पसरली. राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले असल्याने व रस्ता निर्धोक असल्याने या मार्गावरून गाड्या भरधाव जातात, मात्र थोडीशी चूकही जीवावर बेतू शकते याचा धडा या घटनेने दिला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!