इंदापूरमध्ये खळबळ!! अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या नेचर उद्योग समूहावर आयकर विभागाचा छापा…


इंदापूर : आज सकाळी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंधूंच्या घरी छापा पडल्याची बातमी ताजी असताना आता इंदापुर तालुक्यातील कळस येथील उद्योजक अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलाइट उद्योगसमूहावर आयकर विभागाने छापा मारला. यामुळे इंदापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

त्याचबरोबर देसाई यांचे जावई जय हिंद कॅटल फीडचे व्यवस्थापकीय संचालक मयूर कांतीलाल जामदार यांच्या निवासस्थानावरही आयकर विभागाचे पथक पोहोचले आहे. याबाबत याबाबत तालुक्यात चर्चा रंगली आहे. अर्जुन देसाई हे उद्योजक असून, बांधकाम व्यावसायिक देखील आहेत.

याबाबत माहिती अशी की, देसाई उद्योगसमूहाचे दुग्ध प्रकल्प, पशुखाद्य उत्पादन, पाणी प्रकल्प या ठिकाणी कार्यरत आहे. सुमारे २० लाख लिटर दैनंदिन क्षमता असलेला मोठा दूध प्रकल्प या ठिकाणी गेली आठ वर्षे कार्यरत आहे. विविध भागांतून या ठिकाणी दूध आणले जाते. या माध्यमातून दूध पॅकिंग करून विक्री केली जाते. याठिकाणी बटर, लोणी, दूध पावडर, तूप यांचे उत्पादन घेऊन वितरण केले जाते.

याठिकाणी पाणी प्रकल्प तसेच पशुखाद्य उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. आज सकाळी ६ वाजता आयकर विभागाचे २५ अधिकारी आठ वाहनांच्या ताफ्यासह नेचर उद्योगसमूहात दाखल झाले. त्यानंतर त्यातील एका पथकाने देसाई यांच्या घरातही तळ ठोकला आहे. याबाबत अजूनही तपास सुरू असून याबाबत कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत उद्योजक अर्जुन देसाई यांनी शरद पवार गटाला सहकार्य केल्याची चर्चा आहे. देसाई हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जात असले, तरी शरद पवार गटाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!