पुण्याच्या रुपाली चाकणकर कोणाच्या गटात? भूमिका केली जाहीर…


पुणे : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची अजित पवारांसोबत असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडल्याचे दिसून आले. चाकणकर सुप्रिया सुळे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.

दरम्यान, अजित पवार यांच्या निर्णयामुळे हर्षवर्धन पाटील यांनी झोप उडाली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. चाकणकर यांचे पद संविधानिक असून शिंदे फडणवीस सरकार काळातही ते कायम आहे.

या पदाचा कालावधी ३ वर्षे आहे. खासदार सुनील तटकरे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. तटकरेंनी नवीन नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद देण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या विद्या चव्हाण या शरद पवार यांच्या सोबत आहेत. यावेळी सुनिल तटकरे यांनी विविध संघटनात्मक नियुक्त्या केल्या. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केली.

तर युवक काँग्रेस अध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती केली. यावेळी प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, उमेश पाटील, संजय तटकरे आणि सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!